Amalner

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक…अमळनेरच्या तरुणाचा सायटोमेगालो विषाणूने मृत्यू..!जळगांव जिल्ह्यात पहिली घटना..!

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक…अमळनेरच्या तरुणाचा सायटोमेगालो विषाणूने मृत्यू..!जळगांव जिल्ह्यात पहिली घटना..
जळगाव :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आता सायटोमेगालो हा नवीन विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा रुग्ण आढळून पहिला मृत्यू झाला आहे. ही अत्यन्त चिंताजनक बाब असून कोरोना नंतर होणाऱ्या अतिरिक्त परिणाम दिसून यायला लागले आहेत. सदर व्यक्ती अमळनेरची असून नितीन नंदलाल परदेशी वय 33 असे ह्या तरुणाचे नाव आहे.ह्या तरुणाला कोरोना झाल्यानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली व त्याला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा २४ रोजी रात्री मृत्यू झाला असून सायटोमेगालो विषाणूची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर येथे राहणारा नितीन परदेशीला कोरोनाची लागण झाली होती. अमळनेर येथेच उपचार घेऊन बरा झाला होता.पण पुन्हा ताप येऊ लागला व ऑक्सिजनची पातळी खालावली. म्हणून त्याला जळगावला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. अखेर सोमवारीरात्री त्याची प्राणज्योत मालवली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button