Aurangabad

मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातील रोहयो कामाची होणार चौकशी

मंत्री संदीपान भुमरे यांच्या गावातील रोहयो कामाची होणार चौकशी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिले आहेत.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. पाचोड ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या रोहयोच्या कामावर कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची नावे भरून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असल्याने मोठी खळबळ उडाली होती.
आज जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी पाचोड येथील रोजगार हमी योजनेच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button