नगरसेवक सुनिल रनवरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कोरोनाकाळात समाजात सर्वत्र प्रशासकीय तसेच समाजातील दानशूर व्यक्ती कंडून मदतीचा ओघ सतत चालू आहे .
नेहमीच सामाजिक कार्याचा दृष्टिकोन ठेवणारे मूरगुड चे माजी नगरसेवक सुनिल रनवरे यांनी या कोरोना च्या संकटात मूरगुड ग्रामीण रुग्णालयास बैठकी साठी खुर्च्या, गॅस शेगडी, अत्यावश्यक औषधे तसेच मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर व स्टाफ यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मूरगुड चे नगराध्यक्ष राजेखान जमादार,नगरसेवक मारुती कांबळे, संदीप कलकुटकी,धोंडीराम परीट,विकी साळोखे,विनायक भोई,खामकर सर,अशोक दरेकर, अर्जुन रानमाळे,मयूर अंगज,संग्राम डवरी(सर), सोहेल नदाफ,ओंकार खराडे उपस्थित होते.
सुनिल रनवरे यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .






