?️अमळनेर कट्टा…जेंव्हा अमळनेर च्या आमदारांच्या कार्यकर्त्याचे ट्रॅकटर पकडून पोलीस सोडतात..! अरे ओ सांबा कितने ट्रॅकटर थे..! 3 सरदार..!फिर..!फिर कुछ नहीं सरदार “ठाकूर” के आदमी थे..!
अमळनेर येथील बोरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सातत्याने होत असतो.यातील वाळू माफियांच्या हक्काचा अड्डा म्हणजे हिंगोणे येथील बोरी नदी पात्र..काल दोन ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅकटर वर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पांझरा नदीत तांदळी येथे रात्री 3 ट्रॅकटर महसूल विभागाने ताब्यात घेत कार्यवाही केली. तर याच वेळी म्हणजे रात्री 8 ते 8.30 दरम्यान हिंगोणे येथे बोरी नदीत 3 ट्रॅकटर पोलिसांनी पकडले.असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. पण ह्या 3 ट्रॅकटर वर कोणतीही कार्यवाही न होता सोडून देण्यात आले आहे. असे समजते की यातील ट्रॅकटर आमदारांचे विश्वासू निकटवर्तीय राष्ट्रवादी चे कार्यकर्ते बाळू पाटील यांचे ट्रॅकटर होते.ह्या 3 ट्रॅकटर ची जागे वर तोडी झाल्याची खात्री शीर बातमी ठोस प्रहार ला मिळाली आहे.
विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याचा मुद्दा घेत वाळू माफियांवर महसूल विभाग कार्यवाही का करत नाही? यामुळे 2 वर्षांपासून लिलाव प्रक्रिया झालेली नाही असे सांगत महसूल विभागाला निशाण्यावर घेतले होते.
बाळू पाटील हे अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा करत आहेत. पण त्यांचे ट्रॅकटर पकडले जात नाहीत कारण लगेच आमदारांचा फोन जातो.किंवा सेटिंग इतकी कडक आहे की महसूल विभाग वाळू वाल्या बाळू नं 2 कडे दुर्लक्ष करत असतो. पण काल 3 ट्रॅकटर पकडून देखील एका बाजूला महसूल विभाग कार्यवाही करत आणि दुसऱ्या बाजूला पोलीस विभाग ट्रॅकटर सोडुन देत..असा अमळनेर चा अजब गजब खेळ सुरू आहे.. हा तिर्रीचा खेळ काही उमजला नाही..!असो सांबा जरा जपून रे बाळा “बाळू”2 खतरनाक आहे हं..!ठाकूर के आदमी थे इसलीये बक्ष दिये..!अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे.






