Aurangabad

1 जूननंतर आम्ही दुकाने उघडणारच, खा. इम्तियाज जलील यांचा इशारा

1 जूननंतर आम्ही दुकाने उघडणारच, खा. इम्तियाज जलील यांचा इशारा
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं पाहून राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन उठवणार का? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. पण आता सरकारने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही 1 जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा थेट इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
यावेळी जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे फक्त टीव्हीवर येतात आणि ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या हिताचा काही निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे, पण आम्ही १ जूननंतर दुकानं उघडणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
इतकंच नाहीतर, दुकानदारांचे हप्ते आणि व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात यावं. नाहीतर आम्ही लॉकडाऊन असला तरी तो झुगारून दुकानं उघडू असा थेट इशारा यावेळी इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button