Aurangabad

गुंडाकडून सक्तीची वसुली थांबवा ; खासदार इम्तियाज जलील

गुंडाकडून सक्तीची वसुली थांबवा ; खासदार इम्तियाज जलील
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात अ‍ॅटोरिक्षा व इतर प्रवासी वाहनांचे थकीत बँक हफ्ते वसुलीसाठी बॅंकांचे एजंट कर्जदारांना धमकावत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या खाजगी रिकव्हरी एजंटना त्वरीत थांबवा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्र पाठवून केली आहे.
कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीची खाजगी वाहने देखील बंद आहेत. त्याआधीच्या पहिल्या कोरोना लाटेत देखील सहा महिन्यांहून अधिक काळ लाॅकडाऊन होता. त्यामुळे रिक्षा व काळीपिवळी चालकांना आपली वाहने चालवता आली नाही.
कोरोनाच्या काळात अ‍ॅटोरिक्शा, काळी पिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहनांचे हफ्ते वसुली थांबली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात सगळी वाहने जमा करण्याचा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button