खतांचे भाव वाढवण्याचे अधिकार कंपन्यांना दिले कुणी? खा. जलील यांचा सवाल
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोनाच्या संकटाने आधीच सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी तर या परिस्थितीमुळे अधिकच अडचणीत सापडला आहे.
कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर आता कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने शेतमालाला कुणी विचारेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खरिप हंगामात पेरणीची तयारी करावी तर रासायनिक खंताच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली. आता ही भाववाढ कोणी केली यावरून वाद सुरू झाला आहे.
भाजपच्या म्हणण्यानूसार ही भाववाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली आहे. मग माझा प्रश्न आहे की, या कंपन्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे की नाही?
भाववाढ करण्याचे अधिकार या कंपन्यांना दिले कुणी? असा सवाल एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.






