Aurangabad

मोबाईल मेडिकल व्हॅन दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यदूत : जिल्हाधिकारी

मोबाईल मेडिकल व्हॅन दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यदूत : जिल्हाधिकारी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत गावखेड्यातील, दुर्गम व आदिवासी भागात असणाऱ्या आरोग्य सुविधेत भर घालून मोबाईल मेडिकल व्हॅन नागरिकांना आरोग्यदूत ठरेल, असे मत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मेडिकल मोबाईल व्हॅनचे उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, मोबाईल व्हॅनच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली निरवे हे उपस्थित होते.
याप्रसंगी मोबाईल व्हॅनमध्ये सुसज्ज असलेल्या सेवासुविधा या विषयी डॉ. वैशाली निरवे यांनी माहिती दिली. यामध्ये गर्भवती महिला व नवजात बालकांच्या आरोग्याविषयीच्या सुविधांबरोबरच सामान्य बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असलेले उपचार व औषधी याविषयीची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button