?️अमळनेर कट्टा…अमळनेर पोलिसांची ब्रेक द चेन च्या संदर्भात मोठी कार्यवाही…अनेकांना दंड..!
अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दिनांक १७-०५-२०२१ रोजी ब्रेक चैन संदर्भानने विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. त्यात प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे करण्यात आली आहे.
१) १०२ व्यक्तींची एंटीजेन टेस्ट केली असता ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आलेत आहेत.
२) विना मास्क २९ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे तर ०१ व्यक्तींवर ३५० रुपये दंड ०१ व्यक्तींवर २०० रुपये दंड असा एकूण १५,०५०/- रुपये दंड
३) M act प्रमाणे ५४ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे १०,८००/- रुपये दंड
४) विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने ४८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली
५) हातगाडी फिरणारे २० व्यक्तींवर २००/- रुपये प्रमाणे ४०००/- दंड करण्यात आला आहे.
६) संचार बंदीचे उल्लंघन करून विना कारण फिरणारे ८ व्यक्तींवर १००० रुपये प्रमाणे ८०००/- दंड आणि १५ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ३०००/- दंड असा एकूण ११,०००/-करण्यात आला आहे.
आज रोजी १७६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून ४०८५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.






