Parola

आदर्श शिक्षक स.ध. भावसार यांची आगग्रस्त कुटुंबाला मदत…

आदर्श शिक्षक स.ध. भावसार यांची आगग्रस्त कुटुंबाला मदत…
कमलेश चौधरी पारोळा
पारोळा : तालुक्यातील विचखेडे गावात सोमवार दिनांक १० मे २०२१ रोजी पहाटे शार्ट सर्कीटने लागलेल्या आगीत सुपडू एकनाथ सुर्यवंशी यांचे घरातील सर्व संसारोपयोगी व इतर साहित्य,अन्नधान्यासह दोन बोकड व चार बकऱ्या देखील मरण पावल्या. क्षणार्धात. होत्याचे नव्हते झाले.संपूर्ण घरच जळाले. पुर्ण कुटुंब रस्त्यावर आले.सर्वच वृत्तपत्रांनी या आगीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन मदतीचे देखील आवाहन केले.त्या अनुषंगाने येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी प्रत्यक्ष विचखेडे येथे जाऊन आगग्रस्त कुटुंबाला भेट देऊन पाहणी व चौकशी केली.त्यांचे सांत्वन करुन धीर दिला व रोख रुपये पाच हजारांची मदत देऊन पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.
भावसार सर मध्यम वर्गीय निवृत्ती वेतन धारक व वयोवृद्ध असुनही ते अशा प्रसंगी मदतीसाठी धावून जातात आजपर्यंत त्यांनी अनेक व्यक्ती, संस्था, आगग्रस्त, आपत्ती ग्रस्त, गोरगरीब कुटुंबे तसेच मुख्यमंत्री, पंतप्रधान सहाय्यता निधी अशा विविध अंगांनी समाजाला मदत केली आहे.भावसार सर्वांबरोबरच सोशल मीडियातील डॉ जितेंद्र कोल्हे, डॉ सचिन बडगुजर, अनिल टोळकर,अभय पाटील, जगदिश गुजराथी व प्रथा प्रदीप औजेकर यांनी देखील प्रत्येकी एक हजाराची मदत दिली याबद्दल आगग्रस्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button