Amalner

?️ अमळनेर कट्टा… चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी ईद साजरी होणार

?️ अमळनेर कट्टा… चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी ईद साजरी होणार
अमळनेर : बुधवारी रात्री अमळनेर शहर ईदगाह मुस्लिम कमिटीची सभा मौलाना नौशाद आलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यात संपूर्ण भारतात कुठेही चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद ही शुक्रवारी साजरी करण्यात येणार असल्याचा एकमुखी ठराव सर्वा नुमते करण्यात आला.
बुधवारी रात्री झालेल्या अमळनेर शहर ईदगाह मुस्लिम कमिटी च्या मीटिंग मध्ये इदगह ट्रस्टचे हाजी कादर जनाब यांनी मार्गदर्शन केले.
मौलाना नौशाद आलम यांनी ईद चे व चाँद बाबत माहिती दिली.
*ईद ची नमाज घरी अदा करा — आवाहन*
शासनाचे आदेश नसल्याने यावर्षी सुद्धा ईद ची नमाज आप आपल्या घरी अदा करावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा समितीमार्फत करण्यात आलेले आहे.
*मीटिंगमध्ये यांची होती उपस्थित*
मौलाना नौशाद आलम,हाजी कादर जनाब,फय्याज भाई,रियाज भाई,राजु शेख,जाकीर पठान,जाविद भाई,अहेमद पठान,ईमरान भाई,मसुद पठान,खलिल पठान यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button