?️ अमळनेर कट्टा… शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रारंभ योजना
अमळनेर : 15 मेपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत
बियाण्यांसाठी अर्ज स्वीकृती प्रारंभ योजना
महाराष्ट्र शासन कृषी विभाग- महा डीबीटी (DBT)पोर्टलवर ‘शेतकरी योजना
या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेले आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी(DBT)
पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेत अंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन भात तूर मूग उडीद मका बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून 15 मे 2021 पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग या डीबीटी(DBT)
पोर्टल च्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर’ संगणक, लॅपटॉप, टॅबलेट ,सामुदायिक सेवा केन्द्र, ग्रामपंचायतील संग्राम केंद्र, इत्यादी माध्यमातून मुक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून द्यावा लागेल ज्या वापरकरत्या कडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार क्रमांक नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा डीबीटी (DBT)
पोर्टल मध्ये नमूद करून त्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन कृषी विभाग डीबीटी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारे आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामुहीक सेवा केंद्राची मदत देऊ शकतात तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास इमेलवर किंवा कृषी कार्यालयात संबंधित कृषी सहाय्यक कृषी मित्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री .संभाजी ठाकूर व उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालय
श्री. जाधवर यांनी केले आहे.






