?️अमळनेर कट्टा…अतिक्रमण विभागातील अतिरिक्त सफाई कामगारांना नियमित सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात न प मुख्याधिकारीना निवेदन…
अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदे तर्फे अमळनेर नगरपरिषदे च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात
अतिक्रमण विभागातून प्रस्थापित सफाई कामगारांना काढून रोटेशन प्रमाणे
इतर सफाई कामगारांची नेमणुका होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.न प च्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागात जे सफाई कामगार नेमले
आहेत ते सफाई कामगार वर्षानुवर्षे चिरीमिरी देऊन त्याच ठिकाणी अतिक्रमण चे कामे (जे अतिक्रमण कधी तरी निघते) त्यामुळे संबंधित कामगार अतिक्रमण अधिकाऱ्यांना सोईच्या नेमणुकीसाठी चिरीमिरी देऊन कामचोर पणा करतात आणि अतिक्रमण च्या नावाखाली हप्ता वसुलीचे काम सुरू आहे.
या बाबतीत बऱ्याच वेळा भानगडी देखील झालेल्या असून त्या बाबतीत तक्रारी पण
दाखल आहेत. या साठी मा.जिल्हाधिकारी साहेब,जळगाव यांचे कडील आदेशाने सफाई कामगारांना त्यांच्या सफाईच्या कामा व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम देऊ नये असे आदेशीत असताना देखील त्यांना अतिक्रमण च्या नावाखाली हप्ता वसुलीचे काम दिलेले असल्यामुळे इतर कामगारांवर अन्याय झाल्यासारखे वाटत आहेत. कारण इतरही कामगारांना त्यांचे सारखे कमविण्याचा नैसर्गिकरित्या
अधिकार आहेच ना म्हणून आपणा स विनंती की एक तर अतिक्रमण विभागात प्रस्थापित सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करून रोटेशन पद्धतीने इतर सफाई कामगारांना त्या ठिकाणी नेमणुका द्याव्यात किंवा मा.जिल्हाधिकारी साहेबांनी सफाई कामगारा संदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी विनंती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.






