?️ अमळनेर कट्टा… अमळनेर तालुक्यातील धावडे गावातील १८ जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर : तालुक्यातील धावडे येथे माती उचलण्यावरून दोन गटात दंगल झाली असून दोन्ही गटातील प्रत्येकी एक जण जखमी झाले असून एकूण १८ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धावडे येथील उपसरपंच यांचे पती भगवान हरी पाटील यांनी फिर्याद दिली की त्यांनी कोणासही गावठाण जागेतील माती भरू देण्याबाबत सांगितले नसताना १६ रोजी रात्री साडे आठ वाजता त्यांच्या घरासमोर आरोपी लीलाधर बळीराम पाटील , श्रीकांत प्रदीप पाटील , संजय पांडुरंग पाटील , बळीराम पुंडलिक पाटील , अशोक पुंडलिक पाटील , भूषण मधुकर पाटील , योगेश संजय पाटील , अनिल पितांबर पाटील , लोकेश लीलाधर पाटील यांनी तुझी पत्नी उपसरपंच आहे याचा फायदा घेऊन तू गावातील माती का दिली यांच्यावरून वाद घालून फिर्यादी व त्याचा मुलगा योगेश याला आरोपींनी काठ्यांनी डोक्यावर मारहाण करून दुखापत केली अशी फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटातर्फे बळीराम पुंडलिक पाटील यांनी फिर्याद दिली आरोपी भगवान हरी पाटील , योगेश भगवान पाटील , रमेश दयाराम पाटील , संजय दयाराम पाटील , अजय संजय पाटील , सुधाकर दयाराम पाटील , भूषण गोकुळ पाटील , जगणं भालेराव पाटील ,सुनील मधुकर पाटील यांनी फिर्यादी गावठाण वरील माती डंपर मध्ये भरत असताना चालकास कोणाच्या परवानगीने माती उचलत आहेत असे विचारले त्यावेळी चालकाने भगवान पाटील व संजय पाटील यांच्या परवानगीने माती भरत असल्याचे सांगून रिकाम्या चौकशा करू नको नाहीतर महागात पडेल असे बोलून वाद घातले आणि लोखंडी विळ्याने मारहाण करून बळीराम पाटील यांना व इतरांना जखमी केले अमळनेर पोलीस स्टेशनला ९ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







