कागलच्या गणेश नगरमध्ये एक हजार घरकुलांचे वाटप….. ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने प्रकल्प तडीस… १२ ते १५ लाखांचे घरकुल मिळाले अवघ्या ५० हजारात
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कागल शहरातील गणेश नगरमध्ये नागरिकांना एक हजार घरकुलांचे वाटप ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प तडीस नेला आहे. बाजार मूल्यानुसार बारा ते पंधरा लाख रुपये किंमत होणाऱे हे घरकुल अवघ्या ५० हजारात मिळाले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढीचे पूजन करून नागरिकांनी केला घरकुलात प्रवेश ………
घरकुलातील नागरिकांसोबतच मंत्री श्री. मुश्रीफ यांनीही खाल्ली पुरणपोळी……..
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे स्वप्न बघितले होते…….
या घरकुलात राहून मुलाबाळांचे चांगले शिक्षण पूर्ण करा आणि जीवनमान उंचीला………
राहिलेली अडीचशे घरेही दसऱ्यापर्यंत पूर्ण करून देऊ…..
रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही एक हजारावर घरे पूर्ण
म्हाडाच्या माध्यमातून कागलच्या सुपुत्रांना वीस लाखापर्यंतचे घर देणार अवघ्या पाच लाखात
यापुढेही भाड्याने राहणाऱ्या तसेच कमी जागेमुळे अडचणीत राहणार्यांना दोन हजारावर कुटुंबांना देणार आरसीसी घरे






