?️ अमळनेर कट्टा… प्रतापचा विद्यार्थी बापू भिल याचे सेट परीक्षेत यश….
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी बापू सत्तार भिल याला सेट परीक्षेत यश आले आले आहे. काल संध्याकाळी महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात बापूने यश मिळविले असल्याचे त्याला आज समजले. बापूचे वडील सत्तार भिल शिरपूर तालुक्यातील वासरडी या एका छोट्याश्या गावात हातमजुरी करत असतात. आणि बापू हा पहिल्यावर्गापासून अमळनेर तालुक्यातील लाडगांव येथे राहत होता. व तेथून शिक्षण घेत होता. त्याचे संपूर्ण शिक्षण हे अमळनेर तालुक्यातच झाले. सध्या तो बीएडसाठी प्रवेशित असून शेवटच्या वर्षाला आहे. व प्रताप महाविद्यालयातील CCMC मध्ये अभ्यास करीत होता. व या वर्षी त्याने इंग्रजी विषयातून सेट साठी परीक्षा दिली होती. व काल रात्री लागलेल्या निकालात बापू भिल पास झाला असून त्याला पहिल्या पेपर ला 40 तर दुसऱ्या पेपर ला 96 गुण प्राप्त झाले आहेत. आता त्याच्या नावासमोर प्राध्यापक पदवी लागणार आहे.







