Amalner

?️अमळनेर कट्टा..आणि आई वडिलांची सेवा करत त्याने सोडले प्राण..!

?️अमळनेर कट्टा..आणि आई वडिलांची सेवा करत त्याने सोडले प्राण..!

अमळनेर येथील तंबापुरा भागातील रहिवासी मुलाने आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करून त्यांचा जीव वाचवून स्वतः चा जीव गमावला आहे.कोरोना ग्रस्त मातापित्यांची सेवा करत त्यानाव “कोरोना मुक्त” केले स्वतः कोरोना ग्रस्त झाल्याने उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की तांबापुरा अमळनेर येथील रहिवासी प्रवीण सुखदेव भालेराव (वय-36) ह्या युवकाचे वडील निवृत्त प्राथमिक शिक्षक सुखदेव भालेराव (वय 72) व पुष्‍पाबाई भालेराव (वय 65) हे वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलासह राहतात. त्यांना दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे जावई असा परिवार आहे. दोन्ही मुले कामानिमित्त सुरत येथे वास्तव्यास आहेत. मोठे चिरंजीव प्रवीण भालेराव (वय- 36) हे सुरत येथे आपली उपजीविका भागवत वृद्ध आई-वडिलांना पैसेही पाठवीत होते.

वडील सुखदेव भालेराव यांना सुरुवातीला त्यानंतर आई पुष्‍पाबाई भालेराव यांनाही कोरोना झाल्याने दोघांची सेवा करण्यासाठी प्रवीण भालेराव हे सुरतहून अमळनेरला आले. त्यांनी वृद्ध माता-पित्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आपला जीव धोक्यात घालून ते वृद्ध मातापित्यांची सेवा केली. ह्या सेवेमुळे हे वृद्ध दाम्पत्य अखेर कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचले. मात्र यादरम्यान प्रवीण ला कोरोनाने घेरले.प्रवीण ला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसापासून ते कोरोनाशी झुंज दिली. आणि ही झुंज काल अपयशी ठरली.प्रविण ला वेळे वर इंजेक्शन न मिळाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.. प्रवीण यांच्यावर आज सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.संपूर्ण तांबापुरा भागात शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button