ऑक्सिजन फ्लो मीटर तोंडावर आदळून कोरोना योद्धा विक्की खोकरे जखमी…!!
जखमी अवस्थेतही प्राणाची बाजी लावून कोरोना रूग्णाला हाॅस्पिटलला ऍडमिट करुन प्राण वाचवले.
विक्की खोकरे एरंडोल
एरंडोल : टोळी, ता. एरंडोल येथील कोरोना रुग्णांची प्रकृती ऑक्सिजन अभावी बिघडल्याने त्याला आपल्या अॅम्बुलन्सने धुळे येथील रूग्णालयात नेत असताना एरंडोल येथील सर्वसामान्यांचा देवदूत समजला जाणारा कोरोना योद्धा विक्की खोकरे हा अॅम्बुलन्स मधील आॅक्सीजन रुग्णांना फ्लो मीटरचा काॅक तोंडावर आदळून गंभीर जखमी झाला तो एरंडोल येथील रूग्णालयात उपचार घेत आहे.
आपल्या अॅम्बुलन्सने टोळीच्या कोरोना रुग्णांला धुळ्याला नेताना पहिल्या आॅक्सीजन सिलेंडर मधील आॅक्सीजन संपल्याचे रूग्णांच्या पत्नीने सांगितले. त्यासाठी तिने सिलेंडरचे फ्लो मीटर फिरवून पाहिले होते.विक्कीने अॅम्बुलन्स रस्त्याच्या बाजूला लावून नवीन सिलेंडर लावण्याच्या प्रयत्न करताच आधीच्या सिलेंडरचे फ्लो मीटर त्याच्या तोंडावर आदळले. तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहू लागले. त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी चक्कर यायला लागली. पण आपण येथे थांबलो तर रुग्ण वाचणार नाही, हे समजताच विक्की आपण जखमी झाल्याची पर्वा न करता आधी रूग्णाला धुळे येथील रूग्णालयात अॅडमिट केले आणि नंतरच आपल्या रक्ताने वाहणाऱ्या जबड्यावर,धुळे येथील नागेज कंडारे,दिगविजय गोयर व हा हृदयरोग तज्ञ डॉ प्रांजल पाटील यांच्या मदतीने प्राथमिक उपचार घेतले. आता त्याची प्रकृती ठीक असली तरी जखम मोठी आहे आणि अनेक रूग्ण आणि त्यांचे नातलग विक्कीची देवदूतासारखी वाट पाहत आहेत.
या कोरोना काळात विक्की खोकरे हा तरुण रात्रंदिवस कोरोना रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याकामी धडपडतो आहे. मदतीला धावतो आहे आणि रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करतो आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी विकीला अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे पत्र लिहून त्याच्या कार्याचे कौतुक केले होते.
तो एरंडोल करांसाठी संकटमोचक म्हणून कार्य करत आहे






