श्री शाहू हायस्कूल , ज्यूनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी कला, वाणिज्य,विज्ञान शाखेचा सदिच्छा समारंभ व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल येथे इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व बक्षीस वितरण समारंभ 2020 -2021 उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकामध्ये उपप्राचार्य श्री बी के मडिवाळ यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना भविष्यातील करिअर विषयक मौलिक मार्गदर्शन केले. रोख पारितोषिक वितरण समारंभाचे वाचन प्राध्यापक बी.एम. साळवी यांनी केले. सीईटी परीक्षा द्वारे शासकीय महाविद्यालयात इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश मिळाल्याबद्दल सायली कांबळे, सुमित सुदर्शनी व विशाल सुदर्शनी यांचा कॉलेज सिल्ड देऊन गौरव करण्यात आला. तर विज्ञान शाखेत कागल केंद्रात प्रथम आल्याबद्दल अमर्त्य कटगे याचा तसेच कला शाखेत कागल केंद्रात द्वितीय आल्याबद्दल साधना गायकवाड व वाणिज्य शाखेत कॉलेज मध्ये प्रथम आल्याबद्दल माधुरी पाटील यांना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच विविध विषयात प्रथम आल्याबद्दल स्नेहल घुले, प्रतिक्षा तोडकर ,आदिती भुरले ,श्वेताली लोहार ,संपदा लोहार, सुरेखा खोत व मयुरी पेडणेकर या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आला. अनघा पसारे ,कुसुम हजारे ,साक्षी कदम व आदर्शा घारगे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रम भावपूर्ण केला तर प्राध्यापक मनोगतामध्ये प्रा. आर. एस. पाटणे ,प्रा. सौ आर.एम. पाटील व प्रा. सौ.चौगुले व्ही. एस. यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतामधून प्राचार्य श्री. जे. डी. पाटील यांनी अभ्यासाबरोबर स्वयं शिस्तीचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्री.टी.सी. सुतार यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सौ. एल. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार ची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजचे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, चतुर्थ कर्मचारी वर्ग उपस्थित होता.






