Ratnagiri

कोवीड लस टोचल्यानंतर सरकारी कर्मचारी यांना विश्रांतीसाठी 1 दिवस विशेष सुट्टी द्यावी: सुशीलकुमार पावरा जिल्हाधिकारी व सीईओ यांना निवेदन

कोवीड लस टोचल्यानंतर सरकारी कर्मचारी यांना विश्रांतीसाठी 1 दिवस विशेष सुट्टी द्यावी: सुशीलकुमार पावरा जिल्हाधिकारी व सीईओ यांना निवेदन

रत्नागिरी : सरकारी कर्मचारी यांना कोवीड लसीनंतर विश्रांतीसाठी 1 दिवस विशेष सुट्टी देण्यात यावी , अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्व सरकारी कर्मचारी यांना कोवीड लस टोचून घेण्याचे आपल्या स्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार जिल्हाभर सरकारी रूग्णालयात कोवीड लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना होऊ नये म्हणून शासन राबवित असलेली ही मोहीम अत्यंत चांगली व फायद्याचीच आहे. ही लस कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासुन बचाव करण्यास व रोगप्रतीकारक्षमता वाढविणारी आहे,असे सांगण्यात येते. तसेच कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे ही एक खबरदारी घेण्याची चांगली बाब आहे. परंतु ही लस घेतल्यानंतर काही सरकारी कर्मचारी यांना ञास होत आहे.ही लस इतर लसी पेक्षा जड आहे. लस घेतल्यानंतर अंग तापणे, ताप येणे,हात सूजणे,इंजेक्शन टोचलेल्या जागी रक्त येणे,चक्कर येणे, सर्दी खोकला जाणवणे , अनफिट वाटणे इत्यादी ञास काही कर्मचारी यांना जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून सरकारी कर्मचारी यांना कोवीड लस टोचल्यानंतर विश्रांती साठी व औषधोपचारासाठी 1 दिवस विशेष सुट्टी देऊन सवलत देण्यात यावी. जेणेकरून लस टोचलेल्या सर्व कर्मचारी तंदुरुस्त- फिट होऊन नव्याने उत्साहात सरकारी कामे करतील. म्हणून सरकारी कर्मचारी यांच्या या व्यथेकडे लक्ष देऊन कोवीड लस टोचल्यानंतर 1 दिवस विशेष सुट्टी विश्रांती साठी देण्यात यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button