?️अमळनेर कट्टा..अमळनेर राहील आता “हे ” चार दिवस बंद..! 3 दिवसांचा लॉक डाऊन 4 दिवस
अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी दि 27 मार्च 2021 ते 28 मार्च 2021(शनिवार आणि रविवार) हे दोन दिवस लॉक डाऊन घोषित केला आहे तर दि 30 मार्च म्हणजे सोमवारी जनता कर्फ्यु आहे असे एकूण 3 दिवस बंद जाहीर करण्यात आला होता. परंतु आज सायंकाळी मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर दि 29 ते 31 मार्च पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर केला आहे.6यामुळे आता अमळनेर एकूण 4 दिवस म्हणजे 28 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत बंद राहील असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले आहे.






