शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा: सुशीलकुमार पावरा
रत्नागिरी : शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
महाराष्ट्रात व रत्नागिरी जिल्ह्यात सन 2005 नंतर नोकरीला लागलेल्या सर्व विभागातील सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. अशांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली. ती योजनाही आता बंद करण्यात आली असून जमा झालेली रक्कमेचा हिशोब कर्मचारी यांना देण्यात आलेला नाही. 2005 पूर्वी लागलेल्या सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. जुन्या लोकांच्या बरोबरीनेच नवीन कर्मचारी हे काम करत असतात. तेव्हा 2005 पूर्वी लागलेल्या सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन देणे व 2005 नंतर लागलेल्या सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन बंद करणे, हा कुठला न्याय आहे? म्हातारपणी आपल्या उदरनिर्वाह साठी पेन्शन हाच आधार असतो.आणि तो आधारच शासनाने बंद केल्यामुळे सरकारी कर्मचारी यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून ठिक ठिकाणी उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी मागणी करत आहेत. तेव्हा सरकारी कर्मचारी यांचे हित लक्षात घेऊन 2005 नंतर नोकरीला लागलेल्या सर्व सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.






