Amalner

?️अमळनेर कट्टा..प्रशासनाचा मनमानी कारभार..!हातगाडी वाल्या मजबूर व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी..!तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दीकडे जाणून बुजून काना डोळा..!काय आहे रे हे साटं लोटं..!

?️अमळनेर कट्टा..प्रशासनाचा मनमानी कारभार..!हातगाडी वाल्या मजबूर व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी..!तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गर्दीकडे जाणून बुजून काना डोळा..!काय आहे रे हे साटं लोटं..!अमळनेर येथे गेल्या संपूर्ण महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सामान्य माणूस, व्यापारी,लहान सहान धंदेवाईक पोटाची खळगी भरण्यासाठी ह्या अत्यन्त कठीण काळात धडपड करत आहे. गेल्या आठवड्यात सलग 3 दिवस लॉक डाऊन त्यानंतर जेम तेम 3 दिवस धंदा झाल्यानंतर पुन्हा 3 दिवसाच्या बंद ला सामोरे जावे लागत आहे. या अत्यन्त कठीण परिस्थितीत प्रशासनाकडून छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना सहकार्याची अपेक्षा आहे. पण याउलट प्रशासनाकडून मात्र मनमानी कारभार करत कर्मचारी जबरदस्ती करत आहेत.हात गाडी वाल्या लहान लहान व्यावसायिकांचे वजन काटे जप्त करत आहेत. आणि वरून 353 दाखल करण्याची धमकी देत पोलीस ठाणे गाठत आहेत.विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र जन सागर उसळला आहे याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती त राजकीय लोकांच्या वरद हस्त असल्याने ‘तेरी भि चूप मेरी चूप असा प्रकार सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखविला जात आहे. अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनाच्या ह्या आपत्ती व्यवस्थापन काळात परिस्थिती चा गैरवापर सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खत पाणी मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गर्दी वर न बोलणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सामान्य माणसाला त्रास देण्याचा कोणता अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांची मुजोरी वाढली असल्याची चर्चा गावात सुरू आहे. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी साठी 353 चा धाक दाखवून समोरच्या व्यक्तीला माफी मागायला लावणे,पाय धरायला लावणे ते ही चूक नसतांना ही अशी कोणते आपत्ती व्यवस्थापन धोरण आहे याबद्दल नागरिक खूप चिडले आहेत.यावर ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून संबधित कर्मचाऱ्यांना आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा परिणाम खूप वेगळे होतील अशी ही चर्चा गावात सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button