?️अमळनेर कट्टा..अमळनेरात पुन्हा 2 दिवस लॉक डाऊन आणि एक दिवस जनता कर्फ्यु…!
महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे बाधिक झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी सो.जळगांव यांनी दि.24/03/2021 रोजी निर्देश दिलेले आहेत.
आणि ज्याअर्थी, अमळनेर तालुक्यातील कोविड-19 विषाणूमुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. या करीता
अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीत निबंध लागू करणे आवश्यक आहे.
अमळनेर भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये अमळनेर नगरपालिका हद्दीत दिनांक 27 मार्च 2021 पहाटे 5.00 वाजेपासून दिनांक 28 मार्च 2021 रोजी रात्री 10.00 वाजे पावेतो मा.जिल्हाधिकारी यांचेकडील पत्र क्र.दंडा-01/कावि/2021/629
दि.24/03/2021 रोजीचे मंजूरीनुसार खालील प्रमाणे निबंध लागू करण्यात येत आहे.
तसेच मा.जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील आदेश क्र. दंडप्र-01/कावि/577/2021 दि. 22/02/2021 रोजीच्या आदेशात नमुद केले प्रमाणे रात्री 10.00 ते सकाळी 5.00 वा.पावेतो संचारबंदी (Night Curfew) चे आदेश
कायम राहतील.
1) सर्व बाजारापेठ, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपाला/फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील.
4) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय/खाजगी कार्यालये बंद राहतील
5) हॉटेल/रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता) बंद राहतील
6) सभा/मेळावे/बैठका/धार्मिक स्थळे, सांस्कृतीक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील
7) शॉपींग मॉल्स/मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायमशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे,
संमेलने बंद राहतील.
9) पानटपरी,हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून दुध विक्री केंद्र, वैद्यकिय उपचार व सेवा मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट देण्यात येत आहे. या कालावधीत पुर्व नियोजित परिक्षा असल्यास सदर कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांना वर नमुद केलेल्या नियमातून सुट राहील.
वरील प्रमाणे अमळनेर नगरपालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या निबंधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारीतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188, आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील.






