Shirpur

२१ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील दवाखाने आणि मेडीकल स्टोअर्स वगळून सर्व शिरपूरात सायंकाळी ६ पासून संचारबंदी..

२१ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील दवाखाने आणि मेडीकल स्टोअर्स वगळून सर्व शिरपूरात सायंकाळी ६ पासून संचारबंदी..

शिरपूर : शिरपूरात सायंकाळी ६ पासून संचारबंदी
शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर परिसरातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दि. २१ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील दवाखाने आणि मेडीकल स्टोअर्स वगळून सर्व आस्थापना सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात याव्यात. दूध विक्री सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहतील.
दि. ३१ मार्च पर्यंत आठवडे बाजार बंद राहील.

सर्व नागरिक, दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांनी मास्क, सॅनीटायझर आणि सुरक्षित अंतर याबाबतचे नियम काटेकोर पणे पाळणे आवश्यक आहे. नियमाचे *उल्लंघन करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई* करण्यात येईल.
याची नोंद घ्यावी.

– *प्रांताधिकारी, शिरपूर*
*उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर*
*तहसीलदार, शिरपूर*
*पोलीस निरीक्षक, शिरपूर*
*मुख्याधिकारी, शिरपूर*.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button