?️अमळनेर कट्टा…लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर तुफान गर्दी…!उसळला रे लोकांचा जनसागर ..!
अमळनेर येथे उद्या सकाळ पासून सलग 2 दिवसांचा लॉक डाऊन आणि एक दिवस जनता कर्फ्यु असे तीन दिवस अमळनेर शहर बंद आहे.या पार्श्वभूमीवर आज संपुर्ण बाजारपेठेत तुफान गर्दी उसळली होती.बाजारात आज पाय ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती.मंगलमूर्ती पतपेढी पासून ते मुख्य बाजार पट्टा..रेल्वे स्टेशन रोड ते सुभाष चौक..सुभाष चौक ते मनोकामना साडी सेंटर पर्यंत संपूर्ण बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती.आज अमळनेर शहरातील लोकांना जणू काही तीन दिवस खायला काही मिळणारच नाही अश्या मानसिकतेत लोकांनी तुफान गर्दी आज बाजारात केली.तोंडाला मास्क नाही,सोशल डिस्टनगसिंग चे पालन करण्यात आले नाही. दुकांनामध्ये गर्दीचा उच्चांक गाठला होता.आज च्या गर्दीत कोरोना चा प्रसाद किती आणि कसा वाटला गेला याची आकडेवारी येत्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतील तेंव्हा समजेल.






