?️ अमळनेर कट्टा..शहरात इथे सुरू होतंय कोव्हिडं केअर सेंटर..!काय आहे 7 टू 7 नियम..!
अमळनेर येथे तालुक्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आज उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत कोव्हिडं सेंटर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह चोपडा रोड येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेंटर मध्ये 100 बेड ची व्यवस्था असून आज च्या घडीला 64 बेड रेडी अवस्थेत आहेत. जेवण व इतर व्यवस्था उपलब्ध करण्यात आले आहे.
याशिवाय मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार 7 ते 7 हा नियम दुकानदारांना लागू करण्यात आला आहे. दुकाने ही सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत सुरू ठेवता येतील.यात सर्व नॉर्मल दुकानांचा समावेश असेल.तर किराणा भाजी पाला 9 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. हॉटेल,उपहारगृह 9 नंतर बंद करण्यात येतील मात्र पार्सल सेवा 10 वाजे पर्यंत सुरू ठेवता येईल.
दि.१४ मार्च २०२१ चे मा. जिल्हाधिकारी साहेब जळगांव यांनी कोविड-१९ चे या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने ओदश दिले आहेत. त्याप्रमाणे अमळनेर तालुक्यातील व शहरातील सर्व आस्थापना हे रोज सकाळी ०७ ते संध्याकाळी ७ वाजे पावेतो सर्व आस्थापना दैनदिन व्यवहार हे सोशल डिस्टनच्या माध्यामातून गर्दी न होऊ देता चालू राहतील. संध्याकाळी ७ वाजता शहरातील सर्व आस्थपना त्यातील अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता तात्काळ बंद होतील याची सर्व
दुकानदार व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच यापुढे आज पासून दररोज पुढील आदेश
पावेतो रात्री १० ते सकाळी ०५ वाजे पावेतो संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सदर संचार बंदीचे व आस्थपना वेळेत बंद न केल्यास त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
त्याच प्रमाणे मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करा असे निर्देश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत. लग्न विवाह सोहळ्याला होणाऱ्या गर्दी ला आळा घालण्यासाठी उपाय योजना करा.बस स्थानकातील होणारी गर्दी टाळण्यासाठी डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क करून योग्य त्या उपाय योजना राबविण्यात याव्यात.अश्या सूचना उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिल्या आहेत.
बैठकीला उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड ,डॉ गोसावी,डॉ महाजन,आरोग्य कर्मचारी, न प अधिकारी कर्मचारी इ उपस्थित होते.
दरम्यान आज सायंकाळी 7 वाजे नंतर दुकाने बंद करताना बाजारात गोंधळ झाला होता. त्यामुळे दुकानदार आणि नागरिक यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे की सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत ठराविक अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजता बंद होतील.






