बोदगाव येथे कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन शिबिर.
अमळनेर : दिनांक 12. 3 .2021 वार शुक्रवार रोजी बोदगाव पैकी चिंचपाडा येथे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आदिवासी साठी कायदाविषयक जागृतता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत.
याप्रसंगी साक्री तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष वानखेडे साहेब तालुका न्यायालयाचे न्यायाधीश शिवरात्रि साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री जे.टी सूर्यवंशी साहेब, तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री . ॲड. पाटील व कासार साहेब व ॲड.सौ.राऊत मॅडम तसेच तलाठी श्री. जितेंद्र बागुल, ग्रामसेवक पंकज पगारे, पंचायत समिती सदस्य सौ . संगीता गणेश गावित, सौ.सरपंच चंद्रकांत भोये,सो.महाले मॅडम,अहिरे मॅडम उपस्थित होते
या कार्यक्रमात वानखेडे साहेबांनी आदिवासी बांधवांसाठी असलेल्या कायद्यांबाबत मार्गदर्शन करताना कायदेशीर कामासाठी मोफत वकिली करता न्यायालयाकडून वकिलांची नेमणूक करणे, वन जमीन हक्क समिती कायदा, पेसा कायदा 2003, ॲट्रासिटी कायदा, नालसा कायदा 2015 या विषयावर सखोल मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक गणेश गावित आदिवासी बचाव अभियान तालुकाप्रमुख. चंद्रकांत भोये, भरत ठाकरे, उत्तम भोये, बकाराम कामडे, एकनाथ भोये झिपरू गावित,झिपर् पवार ,जिवन जगताप, देविदास गावित हे उपस्थित होते बोदगाव पैकी चिंचपाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश भोये यांनी मानले.







