?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खुर्द या गावात समाजासाठी उपयोग येणारे समाज मंदीर यांच्यासमोर कचऱ्याचे साम्राज्य
विनोद जाधव अमळनेर
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द या गावाचे परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे.तरी पण ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे.कमीत कमी शासनाने जे समाजासाठी उपयोगात येण्यासाठी आणि समाजामध्ये अनेक प्रकारचे संस्कृत कार्यक्रम पार पाडले जातात,आणि बाहेरून येणारे पावणेमंडळीं साठी विश्रांती घेण्यासाठी किंवा एक दोन दिवस आपण समाजाचे कामानिमित्त निवारा करू शकतो.यासाठी आणि समाज मंदिर हा समाजासाठी उपयोगात यावे, या साठी शासनाने ही इमारतची बांधकाम केले आहे. परंतू रामेश्वर येथे ग्रामपंचायत आणि मूर्ख जनता याचा वापर कचऱ्याचे साम्राज्य जमा व्हावे,आणि गावाची प्रत्येक नागरिक आरोग्याला निमंत्रित द्यावे, आपले आणि सार्वजनिक लोकांचे आरोग्य धोक्यात यावे, आणि सगळीकडे दुर्गंधी पसरली जावे, असा विचार रामेश्वर या गावाची ग्रामपंचायतने केलेला आहे. म्हणून शासनाला माझी कडकडीची विनंती आहे की, विकासकामां कडे ,आणि स्वच्छताकडे दुर्लक्ष करणारी आणि भोंगळ कारभार करणारी ग्रामपंचायतचे चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावे ,असे रामेश्वरचे ग्रामस्थ मंडळीनी मनस्ताप करून ठोस प्रहार शी बोलताना सांगितले.







