?️ अमळनेर कट्टा… स्नेहल माळीला राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कास्यपदक
अमळनेर : येथील रहिवासी व हल्ली नवी मुंबईत वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ( बिलबिले) ह्याची सुकन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने २५ वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक मिळवून अमळनेरच्या नावलौकिकात भर घातली आहे.त्यासाठी तिला तिचे उत्कृष्ट व्यायामपटू व सायकलिस्ट वडील शत्रुघ्न माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्यातील पहिले तीन विजेते सायकलिस्ट , सेनादल, रेल्वे,सेनादल, बीएसएफ ,अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते असे एक हजारांहून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते.
त्यातुन ‘ उगवता तारा ‘ म्हणुन एकमेव असलेला ‘ युथ कमिंग स्टार ‘ या पुरस्कारासाठी स्नेहल माळीची निवड करण्यात आली आहे , हे विशेष…!
स्नेहलच्या या यशाबद्दल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी तिचा विशेष सन्मान केला आहे . अमळनेरच्या अनेक मान्यवरांनी ही स्नेहलचे समक्ष भेटून , फोन व सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
भविष्यातही सायकलिंग क्षेत्रामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया स्नेहलने दिली आहे.







