लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने वाढत्या इंधन दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन सादर.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्याशिवाय घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढविण्यात आले आहेत .यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील बनले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी इंधन दरवाढ तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावी व सर्वसामान्य जनतेचे जगणे सुसह्य करावे अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अप्पर चिटणीस संतोष कणसे यांनी निवेदन स्वीकारले .लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण ,पक्षाचे शहर संघटक संतोष बीसुरे, अमोल कांबळे , कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले, शशिकांत जाधव , बाळकृष्ण गवळी आदी पदाधिकारी यावेळीउपस्थित होते .






