?️अमळनेर कट्टा… शहरात 100%बंद ला प्रतिसाद..!काही दुकानदारांवर झाली कार्यवाही..!या दुकानांवर झाली कार्यवाही..!
अमळनेर शहरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवून तसेच संपूर्ण शहरात सोमवारी लॉक डाऊन चे सर्वानुमते ठरले होते. या पार्श्वभूमीवर काल सोमवारी भाजीपाला व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला.परंतु काही नाठाळ दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दंड केला आहे. यात बरीचशी दुकाने झेरॉक्स ची असून जवळपास 8000/- रु चा दंड सर्वांकडून वसूल करण्यात आला आहे.यात नावीन्य झेरॉक्स, लोकसेवा झेरॉक्स, विजय झेरॉक्स, निसर्ग झेरॉक्स, इ चा समावेश आहे तर आरटीओ कॅम्प येथे प्रमाणा पेक्षा अधिक गर्दी असल्यानेतिरुपती ड्रायव्हिंग स्कुल तसेच साने गुरुजी ड्रायव्हिंग स्कुल यांना 5000/रु चा दंड करण्यात आला आहे.
शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सोमवारी गजबजणारा भाजीबाजार बंद ठेवण्यात आला.
सोमवारच्या बंद मध्ये कापड विक्रेते, किराणा दुकानदार, भांडी व फळ विक्रेत्यांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदवून आपापली दुकाने बंद ठेवली. तर जीवनावश्यक सेवेतील कृषी केंद्र, मेडिकल, दवाखाने यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती.






