पेठ वङगावात ” आँल स्पोटर्स” गेम्सचे उदघाटन
प्रतिनिधी अनिल पाटील
मिशन ओलंपिक गेम्स असोशियशेनच्या वतीने पेठ वङगाव (ता हातकणंगले ) येथील वङगाव हायस्कूलमध्ये”” आँल स्पोटर्स गेम्सचे”” आयोजन करण्यात आले होते. या गेम्सचे उदघाटन उद्योजिका व सत्यर्थ एंटरप्राइजेसच्या साँ स्मिता जयंत लंगङे व पेठवङगावचे नगरसेवक सचीन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा आँर्गनायझर मिशन ओलंपिकच्या ङाँ साँ स्मिता सूरेश गिरी यांनी कूठल्याही स्पर्धत यश मिळवायचे असेल तर खेळाङूनी लहानपनापासून सरावर भर दिला पाहीजे त्यामूळे ते शाररिक व मानसिक स्तरावर योग्य ते यश मिळवू शकतात व खेळातून करिअर घङविण्यास खूप संधी प्राप्त होते
जिमन्यास्टिक”” कराटे”” कबङ्ङी”” स्केटिंग”” क्रिकेट या स्पर्धांचा या स्पर्धत समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यातून 240 विद्याथ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी रणजी क्रिकेटपट्टू अभिजीत भोसले”” एम ङी मिशन आँलिंपिक महाराष्ट्राचे उमेश माळी”” श्री भोसले”” श्री सय्यद उपस्थित होते
प्रारंभी प्रास्ताविक कोल्हापूर मिशन आँलिम्पिक प्रेसिङेंट साँरभ पाटील यानी तर आभार व्हाईस प्रेसिङेंट नितीन पाटील यांनी मानले.







