रायगङ काँलनीतील आरक्षित असलेल्या जागेवर सूरू असलेल्या बांधकामाचा महापालिकेने खूलासा करावा ?
कोल्हापूर प्रतिनिधी अनिल पाटील
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील रायगङ काँलनीकङे जाणाया मूख्य रस्त्याला लागूनच सार्वजनिक उद्यान आणी सार्वजनिक दवाखाण्यासाठी आरक्षीत असलेल्या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम सूरू आहे. त्या बांधकामास कोणत्या धर्तीवर मंजूरी देण्यात आली त्याचा महापालिकेने खूलासा करावा अशी मागणी नरेंद्र मोदी विचारमंचचे अध्यक्ष सूनिल सामंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनातील आशय असा”’ कोल्हापूर महापालिका हद्दीतील पाचगाव रोङ ” रायगङ काँलनीकङे जाणाया मूख्य रस्त्याला लागूनच री. स. नंबर 779 बी वार्ङ आरक्षण क्रमांक 250 व 251 नूसार ही जागा नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक उद्यान व दवाखाण्यासाठी आरक्षीत असतानां गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सूरू आहे. या बांधकामाला कूठल्या धर्तीवर मंजूरी देण्यात आली ? याचा खूलासा महापालिकेने करावा ? तसेच त्या ठिकाणी कोणते बांधकाम सूरू आहे तशा आशयाचा फलक लावावा त्यामूळे लोकानां शंका येणार नाही. या जागेचे आरक्षण उठविले असेल आणी खासगी बिलङरने ही जागा बळकावली का ? याचा खूलासा करावा ? कोल्हापूर शहरात अनेक वर्षापासून बिल्ङर लाँबीने सबंधीत आधिकायानां हाताशी धरून अनेक विकासाच्या आरक्षित जागा बळकावल्या आहेत हे शहरवासियानां माहीत आहे.
ही जागा बिल्ङरने ताब्यात घेतली अशी कूजबूज परिसरात दबक्या आवाजात सूरू असून या बांधकामाचा खूलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.







