?️अमळनेर कट्टा…कोरोना Update..अमळनेर तालुक्यात आज 9 रुग्ण..! 3 अधिकारी,दोन शिक्षक+परिवार व इतरांचा समावेश..
अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.आज अमळनेर तालुक्यात 9 कोरोना रुग्ण आढळले असून अँटिजेंट चाचणीत हे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.यात 8 रुग्ण शहर आणि एक रुग्ण ग्रामीण असे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन यांनी सांगितले आहे.या रुग्णांमध्ये अमळनेर न प च्या प्र मुख्याधिकारी,एक अभियंता,दोन चोपडा येथून अपडावून करणारे शिक्षक आणि त्यांची पत्नी, मुख्याधिकारी यांच्या कडील घरकाम करणारी महिला आणि इतर दोन यांचा समावेश आहे तर ग्रामीण मधून मारवड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे..






