?️ अमळनेर कट्टा..अखेरीस कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची बदली रद्द…”कळीच्या नारदांचा” डाव फसला..!
अमळनेर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची बदली रद्द झाली आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची काल रात्री अचानक पणे बदली झाली होती. चुकीच्या आणि अयोग्य मार्गाने अनेक गोष्टी वरिष्ठांकडे पोहचविण्याचा कट रचण्यात आला होता.परंतु आज पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी योग्य बाजू आणि खरी कारणे ,कामगिरी वरिष्ठांसमोर मांडली आहे. त्यामुळे आज रात्री पुन्हा काल रात्री च्या बदली संदेशा नंतर बदली रद्द करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासांत या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने त्यांच्या विरुद्ध रचल्या गेलेल्या षड्यंत्राला न जुमानता आपले कार्य,कर्तृत्व, कार्यक्षमता इ च्या जोरावर न्याय मिळवला आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की 4 दिवसांपूर्वी बॅनर प्रकारावरून वेगवेगळ्या पातळीवर राजकारण करण्यात आले. याच राजकारणाचा एक भाग म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांच्या बदली करून “बदला” घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. खरी घटना आणि या घटनेतील व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून गेम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. घटनेतील व्यक्ती ही स्वतः च्याच समस्येत असतांना कळीच्या नारदांनी संधी साधली होती.
या संदर्भातील बदलीचे संदेश काल रात्री पासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामागील “कळीचे नारद”कोण आहेत याची कल्पना पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना तर आहेच पण तालुक्यात देखील अनेकांना नारदांच्या कारवाया लक्षात आल्या आहेत. असो..!
चांगले कर्म, कर्तव्य आणि विचार हे कधीही वाईट प्रवृत्ती कडून नष्ट होऊ शकत नाही याची प्रचिती आली आहे.तसेच अमळनेर तालुक्याने मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिल आहे.यापुढेही असेच आशिर्वाद आणि प्रेम राहू दयावे.जेंव्हा कोरोनाची लागण झाली होती तेंव्हा तर अनेकांनी विजय मारुती आणि इतर देव स्थानी नवस मानले होते आणि तब्येत चांगली झाल्यावर ते नवस त्यांनी फेडले देखील.मी अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी म्हणून काम केले परंतु अमळनेर शहरातील जनतेने जे भरभरून प्रेम, सहकार्य,आदर,सन्मान दिला तो कुठेही मिळाला नाही. मी सर्व अमळनेर नगरीतील माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे शतशः ऋणी आहे..!आज पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक मग कोरोना संदर्भात कार्यवाही असो की अवैध धंदे बंद करणे,शहरातील सर्व लहान मोठ्या गुन्ह्यांना आळा बसविणे इ महत्वाची कामे पूर्ण केली जातील.रोड रोमियो,रॅश ड्राइविंग, सट्टा, जुगार,इ ना पायबंद घालण्यासाठी योग्य त्या सर्व कार्यवाही केल्या जातील.अधिक जोमाने आणि कार्यतत्पर तेने सर्व कार्यवाही केल्या जातील अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी ठोस प्रहार शी बोलताना दिली आहे.
आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण लहान मोठ्या कार्यवाही पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या असून त्यात सर्वात मोठया आणि जास्त रेड ह्या अवैध गांजा विक्री करणाऱ्या वर करण्यात आल्या आहेत. तसेच कल्याण मटका जुगार वर जवळपास 27 लाखांची रेड करून एक दबंग अधिकारी असल्याची झलक त्यांनी सुरुवातीला च दिली होती. जवळपास 48 लाखांचा गांजा पकडून अवैध गांजा तस्करी करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारे, जळगांव जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना दंड आकारण्यात आला असून सदर फड पी एम फडांत जमा केले आहे.याशिवाय कोरोना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन काळातही रुटीन कार्या व्यतिरिक्त अधिकाधिक विना मास्क कार्यवाही, दुचाकी कार्यवाही,अवैध धंदे कार्यवाही इ करत पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारींची स्वतः जातीने चौकशी करून योग्य ते मार्गदर्शन आणि कायदेशीर कारवाई करण्यात पो नि मोरे यांनी सातत्याने कार्य केले आहे. संपूर्ण कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस पेट्रोलिंग करणे,सर्व बैठकांना हजर राहणे,गाव पातळीवर जन जागृती सह कायदा आणि सुव्यवस्था आबादीत ठेवणे इ सर्व कार्य अत्यन्त जबाबदारी ने आणि कार्यतत्परतेने पूर्ण केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व तालुक्यातील जनतेशी उत्तम संवाद साधत पोलीस अधिकारी हा शांत प्रेमाने बोलूनही योग्य प्रकारे कार्य करू शकतो ह्याच उत्कृष्ट उदा त्यांनी घालून दिल आहे.तसं तर समन्यात पोलीस म्हटला म्हणजे अंगावर ओरडणारा किंवा कायद्याचा विनाकारण बडगा दाखविणारा अशी साधारणपणे प्रतिमा जन सामन्य माणसात असते .पण पोलीस निरीक्षक अंबादास मोरे एक असं व्यक्तिमत्व की मनमिळाऊ, संयमी,शांत,समजूतदार, योग्य निर्णय घेऊन मार्गदर्शन करणारे खाकी वर्दीतील दिलदार माणूस..शिस्तप्रिय, अध्यात्मिक, चौकटीत राहूनही चौकटी बाहेरचे सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे..मैत्रीच्या दुनियेतील खाकी तील राजा माणूस..
त्यांच्या कार्याचा,कर्तृत्वाचा चांगलाच ठसा सामान्य माणसावर पडला आहे.त्यामुळे निश्चितच शहरातील तालुक्यातील गुन्हे कमी होण्यास मदत झाली असून कायदा आणि सुव्यवस्था आबादीत राहत आहे यात शंका नाही. आज पो नि मोरे यांची बदली रद्द झाल्याचा तरुण पिढीला अधिक आंनद झाला असून त्यांनी तो व्यक्त देखील केला आहे.
पो नी मोरे यांनी सांगितले की जसे बदलीचे आदेश निघाले तसे जनतेचे फोन सुरू झाले.आणि अत्यन्त प्रेमाने आणि काळजीने प्रत्येक व्यक्तीने चौकशी केली. बदली होऊ नये त0यासाठी प्रयत्न केले. समाजातील सर्व जाती धर्म आणि क्षेत्रातील प्रतिष्ठित, सामान्य,लहान थोर व्यक्तींनी पाठपुरावा केला. आणि सत्याला न्याय मिळाला अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
बोलताना त्यांचा मन भरून आलं होतं आणि हे मन आनंद आणि अभिमानाने भरून आलं होतं..!






