Kolhapur

सी. पी. आर . रूग्णालयात केसपेपर काउंटर वाढविण्याची लोकराज्य जनता पार्टीची मागणी .

सी. पी. आर . रूग्णालयात केसपेपर काउंटर वाढविण्याची लोकराज्य जनता पार्टीची मागणी .

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून एकच केस पेपर विभाग सुरू आहे. खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये येत असल्याने केसपेपर काढण्यासाठी मोठी गर्दी होत असते. रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागते .वेळेत केसपेपर निघाला नाही तर दुपारनंतर डॉक्टर भेटत नाहीत. रुग्णांचे हाल थांबावेत व त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावा यासाठी सीपीआरमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र केसपेपर विभाग तात्काळ सुरू करावा व केसपेपरचे काउंटर वाढवावेत या मागणीचे निवेदन लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस. एस. मोरे यांना देण्यात आले. लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण तसेच कोल्हापूर शहर सरचिटणीस हिंदुराव पोवार, संघटक शशिकांत जाधव, संतोष बिसुरे, सर्जेराव भोसले, बाळासाहेब गवळी आदी पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ.एस.एस. मोरे यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेवून गुरुवार दि.१८ /२/२०२१ पासून केसपेपर काऊंटर वाढविले जातील तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र केसपेपर विभाग सुरू केला जाईल असे अभिवचन शिष्टमंडळाला दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button