?️ अमळनेर कट्टा… रामेश्वर खु. सरपंच पदी गजेंद्र जाधव तर उपसरपंच पदी परशुराम वंजारी…अमळनेर : तालुक्यातील रामेश्वर खु. येथील ग्रामपंचायत निवड गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली. निवडणूक पार पडलेल्या 67 ग्रामपंचायतींमध्ये या ग्रामपंचायतीचा देखील सहभाग होता. तर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गावातील तरुण गजेंद्र रमेश जाधव (वंजारी) यांची तर उपसरपंच पदी परशुराम झामु वंजारी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एक तरुण एक अनुभवी चेहरा गावाला मिळाल्याने सर्वांनी सरपंच व उपसरपंच या दोघांचे अभिनंदन केले.






