?️ अमळनेर कट्टा..हशीमजी प्रेमजी शॉपिंग जवळ भर रस्त्यात आडवा उभा आहे कंटेनर..अपघातांना आमंत्रण..
अमळनेर येथील स्टेशन रोडवरील हशीमजी प्रेमजी शॉपिंग जवळ भर रस्त्यात आडव्या अवस्थेत एक मोठा कंटेनर उभा आहे. हा कंटेनर काल रात्री 8 वाजून 30 मिनिटांपासून उभा असून भर रस्त्यात असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे ह्या कंटेनर चा ड्रायव्हर जागेवर नसून कोणत्याही प्रकारची गाडी उभी आहे आणि बंद आहे म्हणून चिन्ह,संकेत लावलेले नाहीत.हा रस्ता खूपच वर्दळीचा असून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वच वाहनांना त्रास होत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसून अमळनेर शहरात कायदा,प्रशासन,सुव्यवस्था, नियम इ अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. एव्हढे अवजड वाहन काल रात्री पासून बंद अवस्थेत उभे आहे पण कोणीही तक्रार केली नाही.प्रशासनाने ही लक्ष दिले नाही. कदाचित एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येईल असे लोकांचे म्हणणे आहे.






