Amalner

?️ अमळनेर कट्टा..भूमिपूजन ते  जलपूजन ..@नाथाभाऊ…पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वरून नाराजी तर आजचा व्हिडीओ  2024 मध्ये पुन्हा लावायला लावू…लाव रे तो व्हिडीओ..@बीजेपी कार्यकर्ते..

?️ अमळनेर कट्टा..भूमिपूजन ते जलपूजन ..@नाथाभाऊ…पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वरून नाराजी तर आजचा व्हिडीओ 2024 मध्ये पुन्हा लावायला लावू…लाव रे तो व्हिडीओ..@बीजेपी कार्यकर्ते..अमळनेर येथील पाडळसरे धरणाच्या पाहणी दौरा सह कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.शेतकऱ्यांना येत्या काळात भाकरीत सुद्धा राष्ट्रवादी दिसेल म्हणून त्वरित धरणपूर्ती साठी अधिकचा निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी चे आमदार अनिल पाटील यांनी केली. तर नाथाभाऊ खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पाडळसरे धरण हे संपूर्ण अंमळनेर तालुक्यातच नव्हे तर इतर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कायम आहे. दुष्काळी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणारी जनता त्या कालखंडात आपण पाहिली आणि आता हे धरण शेतीसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे तरी आपल्या कालखंडात पूर्णत्वास न्यावा अशी माझी अपेक्षा,आहे,मी याधरणाचे भूमिपूजन केल,प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली पण दुर्दैवाने पुढच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे कमी होत गेले, याबाबत विचार करा आणि केंद्र सरकार कडे निधी साठी आपल्याला प्रयत्न करता येईल याचा विचार व्हावा.या परिसंवादाला संबोधित करतांना जयंत पाटील यांनी सांगितले की,या भागात एक धरण बांधण्यासाठीचा आग्रह आमदार निवडणुकीपासून आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या भागातले मतदार देखील उपस्थित होते त्यावेळी मला आठवतय की मला अनिल भाईदास पाटील साहेबांनी माझ्या जवळ मागणी केली की मी उभा राहिलो आहे पण मला या धरणाच्या साठी मदत झाली पाहिजे त्यावेळी मी आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही आमदार द्या आम्ही तुम्हाला धरण पूर्ण करून देऊ, त्यावेळी आपले सरकार येईल आणि मी जलसंपदा मंत्री होईल असे वाटलं नव्हतं,धरणाचे डिझाईन करून घेणं आवश्यक होतं त्याप्रमाणे केलं त्याचा सगळा अहवाल प्राप्त होऊन त्यानंतर आता अंतिम चरणात ते डिझाईनिंग गेले एक महिन्यात आपल्याला प्राप्त झाल्यानंतर अडीच वर्षात म्हणजेच तीन फायनान्शियल वर्षात धरण पूर्ण करू,सदर धरणाचे भूमिपूजन खडसे साहेबांनी आणि गोपीनाथरावजी मुंडे यांनी केले आहे तर मी सांगतो की,त्या धरणाचे उद्घाटन हे खडसे साहेबांच्या हाताने व उपस्थितीत होणार याची खात्री देतो,मात्र भारतीय जनता पक्षाने मागील पाच वर्षात एक रुपया दिला नाही ,पाच वर्षात काही काम झालं नाही, म्हणजे 97- 98 मध्ये भूमिपूजन झालं आणि 14 वर्षात धोरणाला पुरेसे निधीं मिळाला नाही मात्र 2024 मध्ये धरण पूर्ण होणार याची पत्रकार बांधवांनी नोंद घ्यावी,त्यामुळे या तालुक्यांना फायदा होणार आहे हे धरण पूर्ण करणं ही इरिगेशन डेव्हलपमेंट कॉपोरेशन मधली प्रायोरिटी असेल, आता सुदैवाने तुमचे आमदार झाले आहेत.महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते जिथे जिथे आहेत त्या सर्वांना भेट देण्याचे काम हे आजच्या या कार्यक्रमातून या उपक्रमातून आम्ही सुरू केले, लोक म्हणायला लागले की आता बहुतेक हे मध्यवर्ती निवडणूक करायचं दिसते पण तसं काहीही साहेबराव होणार नाही,आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष राहणार असा आशावाद त्यांनी दाखविला.मंचावर राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते नाथाभाऊं खडसें, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, गुलाबराव देवकर आप्पा, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील , गफ्फार मलिक साहेब, माजी आमदार मनीष जैन, गुरुमुख जगवाणी, अभिषेक पाटील, विलास पाटील, कल्पना पाटील , संजय पवार, जयश्री पाटील ,रवींद्र पाटील, रोहन सोनवणे, योगेश देसले,सचिन पाटील, उमेश नेमाडे ,अरविंद मानकर, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होतेपाडळसरे धरण गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण स्थितीत राहत असल्याने स्थानिक राजकारण धरणा भवतीच फिरत आहे. धरण पूर्ण करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आश्वासने जनतेला दिली होती मात्र आजतागायत ते पूर्णत्वास गेले नाही. अमळनेर तालुक्यासह आजुबाजु च्या जिल्ह्यासह तालुक्यांना या धरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे सदर धरण पूर्ण करावे अशी मागणी पाडळसरे धरण जन आंदोलन समिती निवेदन देऊन सदर बाब जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.तालुक्यातील दौरा दरम्यान येणाऱ्या बहुतांश गावात ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर प्रताप महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी मोर्चा च्या फलकाचे उद्घाटन ही जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची अतिष बाजी करून विद्यार्थ्यानी जल्लोष केला.

  • बॅनर वर फोटो नाहीत..

बॅनर वर मोठ्या पदाधिकाऱ्यांचे फोटो घेतले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. यात प्रामुख्याने ग्रंथालय सेल चे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी ठोस प्रहार कडे नाराजी व्यक्त केली. तर पणन च्या संचालिका आणि राष्ट्रवादी च्या जुन्या कार्यकर्त्या तिलोत्तमा पाटील,ग्रंथालय सेल च्या रिता बाविस्कर इ नचेही फोटो बॅनर वर नव्हते.त्यांनी जरी नाराजी व्यक्त केली नसली तरी लोकां मध्ये हा चर्चेचा विषय होता. आपसात अनेक वाद असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ही दुफळी या निमित्ताने उघडकीस आली आहे.

  • नाट्यगृह येथील भाषणात 2024 मध्ये धरणाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 2024 मध्ये धरण पूर्ण न झाल्यास आजच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ लावायला लावू… लाव रे तो व्हिडीओ अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

?️ अमळनेर कट्टा..भूमिपूजन ते  जलपूजन ..@नाथाभाऊ...पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वरून नाराजी तर आजचा व्हिडीओ  2024 मध्ये पुन्हा लावायला लावू...लाव रे तो व्हिडीओ..@बीजेपी कार्यकर्ते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button