Amalner

?️अमळनेर कट्टा…हैदराबादची हिना रंगीलीसह अमळनेरचा सुपुत्र युसूफ शोला यांच्या कव्वाली फनकाराने रंगली रविवारची रात्र

?️अमळनेर कट्टा…हैदराबादची हिना रंगीलीसह अमळनेरचा सुपुत्र युसूफ शोला यांच्या कव्वाली फनकाराने रंगली रविवारची रात्र

अमळनेर : गेल्या अनेक वर्षांनंतर रविवारी शहरात कव्वालीचा कार्यक्रम झाला. हुडहुडी भरणार्‍या थंडीत हैदराबादची फनकारा हिना रंगीलीसह अमळनेरचा सुपुत्र प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला यांनी एक से बढकर एक कव्वाली सादर केल्याने रविवारची रात्र उत्तरोत्तर रंगत गेली.
भरतभाऊ पवार, पप्पू कलोसे, अझीम शेख, सईद तेली, अख्तर पठाण यांनी एक शाम स्व. लोकनेते रामभाऊ अण्णा की याद मे या कव्वाली कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजन केले होते.
गेल्या अनेक वर्षानंतर कव्वालीचा कार्यक्रम झाल्याने मोठया संख्येत कव्वाली दर्दी रसिकांनी हजेरी लावली होती. यात अमळनेरचा सुपुत्र प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला आणि हैदराबादची फनकारा हिना रंगली यांच्या कव्वालीनी कार्यक्रम अधिकच रंग भरला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार स्मिताताई वाघ, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, सलिम शेख (टोपी) नगरसेवक, हाजी शेखा मिस्तरी, विक्की आबा जाधव, महेंद्र महाजन, सईद मेवाती, साखरलाल महाजन, प्रा. जयश्री दाभाडे, पत्रकार राजेंद्र पोतदार, मुन्ना शेख, जितु ठाकूर, मुन्ना भाई जलगांववाले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक प्रमुख पाहुण्यांनी भेटी दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button