Amalner

?️अमळनेर कट्टा… अमळनेर तालुका खत विक्रेत्यांची प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न

?️अमळनेर कट्टा… अमळनेर तालुका खत विक्रेत्यांची प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न

अमळनेर : मा.कृषि विकास अधिकारी जि.प.जळगाव यांचे अमळनेर तालुक्यातील अनुदानित रासायनिक खत विक्रेत्यांचा प्रशिक्षण व आढावा दि. ०७.०२.२०२१ वार रविवार रोजी सकाळी ठीक ११.३० वा. रोटरी सभागृह अमळनेर येथे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाली या बैठकीत कृषि अधिकारी
पंचायत समिती अमळनेर चे वर्मा साहेब यांनी मोलाचे खत विक्रेत्याना मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष साठा व ईपॉस खत साठा कसा जुळवायचा तसेच सर्व विक्रेत्यांचे ईपॉस मशीन, ३.१ व्हर्जन अपडेट असणे आता गरजेचे आहे. खत विक्रेत्या कडे डेस्कटॉप व मोबाईल व्हर्जन सुरु करणे खत विक्रेत्याकडील प्रलंबित डिस्पेच आय डी निकाली काढणे.
सर्व विक्रेत्याकडे कॅशलेस पेमेंट सुविधा QR Code सुविधा उपलब्ध करण्यास सांगण्यात आले व खत विक्रेत्यांच्या ईपॉस मशीन, डेस्कटॉप व मोबाईल व्हर्जनच्या अडीअडचणी वर चर्चा करून निराकरण करण्यात आल्या.तसेच यावेळी अमळनेर असो. तर्फे कृषी विभागाला विनंती करण्यात आली की अजून ही शेतकरी खते घेण्यास येतांना आधार कार्ड सोबत आणत नाही यामुळे खूप अडचणी येतात यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन प्रबोधन करावे असे असो. सांगण्यात आले
सदर प्रशिक्षणास म.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी म.कृषि विकास अधिकारी मोहीम अधिकारी ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर साहेब व तालुका कृषी अधिकारी भारत वारे साहेब, वर्मा साहेब कृषि अधिकारी
पंचायत समिती अमळनेर
कृषी सहायक गणेश पाटील, आर सी एफ गणेश खाडे व नागार्जुना कंपनीचे भोई साहेब
अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील बहुसंख्य खत विक्रेते बंधु उपस्थित होते
प्रस्ताविक रविंद्र पाटील यांनी तर आभार योगेश पवार अध्यक्ष यांनी मानले.तर कार्यक्रम यशस्वीते साठी उपाध्यक्ष प्रशांत भदाणे ,सचिव मुन्ना शेठ पारेख ,महेंद्र पाटील ,रवी साळुंखे,प्रदीप कंखरे यांनी प्रयत्न केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button