?️अमळनेर कट्टा..लव्ह लफाटा..इन महिला जिम..!नगरपरिषद महिला जिम मध्ये सुरू आहे कोणता “योगा”..!
अमळनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मागच्या बाजूला अमळनेर नगरपरिषदेची महिला जिम कार्यान्वित आहे.ह्या जिम मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक प्रेमी युगुल आढळून आल्याची चर्चा गावात होती.आता जिम मध्ये देखील लव्ह बर्डस धुमाकूळ घालतात हे ऐकून कानावर विश्वास च बसला नाही. विशेष म्हणजे ही जिम तथाकथित उच्च भ्रू महिलांना चालवायला दिली आहे. अमळनेर शहरातील अगदी प्रतिष्ठित श्रीमंत महिला ही जिम आणि इथे असणारे वाचनालय,योगा वर्ग नृत्य वर्ग चालवीत आहेत.एव्हढे अगदी सुसंस्कृत आणि उच्च भ्रू महिलांच्या देखरेखीखाली ह्या जिम मध्ये प्रेमी युगुलांचा प्रवेश कसा झाला असावा..? ह्या जिम च्या कुलुपांच्या “किल्ल्या”कोणा कोणाकडे आहेत..?यातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उद्धभवतच आहे..! ह्या जिम मध्ये योगा, नृत्य,आणि वाचन करायला येणारा महिला ह्या उच्च प्रतिष्ठित आणि उच्च मध्यम वर्ग यातील आहेत.त्यांची सुरक्षा,प्रायव्हसी इ गोष्टींवर प्रश्न चिन्ह यामुळे निर्माण झाले आहे. असा कोणता योगा क्लास ह्या जिम मध्ये सुरू आहे.? महिलांना सुरक्षित वातावरण जर मिळत नसेल तर या जिम मध्ये महिलांना पाठवविण्यात कसे बरे कोणी धजावेल..? की वेगळा काही गेम सुरू आहे..? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. हा विषय दाबून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आले परंतु गावात दबक्या आवाजात चर्चा मात्र सुरू आहे.
यासंदर्भात अजून अत्यन्त विशेष माहिती अशी की ही जिम अमळनेर महिला मंच ह्या नोंदणीकृत नसलेल्या एका उच्च प्रतिष्ठित महिलांच्या ग्रुप ला चालवायला देण्यात आली आहे. ह्या जिम मध्ये सध्या नृत्य,योगा आणि वाचनालय असे तीन विभाग आहेत.या विभागांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलेकडून 500 रु फी आकारण्यात येत आहे.ह्या 500 रु तुन 40% प्रशिक्षक आणि 60%अमळनेर महिला मंच यांना देण्यात येत आहे.यात नगरपरिषदेला काहीही उत्पन्न नाही..! मग आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की हीच जिम चालविण्यासाठी महिलांच्या बचत गटांना प्राधान्य का देण्यात आले नाही..? एकूण 450 बचत गट अमळनेर नगरपरिषदेत नोंदणी कृत आहेत.सर्व बचत गट हे सामान्य,मध्यम वर्गीय आणि अति सामान्य महिलांचे असून त्यांना जर ही जिम चालविण्यासाठी दिली तर निश्चितपणे गरीब गरजू महिलांना आर्थिक फायदा होणार आहे. याविषयी 5 दिवसांपूर्वी अमळनेर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्या शी चर्चा केली असता त्यांनी देखील ह्या प्रस्तावाचे स्वागत केले.पण अमळनेर नगरपरिषद ही ठराविक श्रीमंत,व्यापारी,बिल्डर,राजकीय लोकांच्या हातात असल्याने त्यांना सामान्य मध्यमवर्गीय माणसे दिसतच नाहीत.असे म्हणावे लागेल..!
अमळनेर च्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकला तो म्हणजे ह्या जिम चे व्यवस्थापन करणे आणि त्याची निविदा प्रक्रिया राबविणे आर्थिक आणि तांत्रिक दृष्टया खूप कठीण आहे मग असे जर होते तर
- जिमचा प्रस्ताव देणे,ती बांधून घेणे, तो निधी अडकविणे इ गोष्टी व्हायलाच नको पाहिजे होत्या.अजून कोणतीही निविदा प्रक्रिया पूर्ण का झालेली नाही.!
- त्याअगोदर नोंदणी कृत नसलेल्या अमळनेर महिला मंचला जिम चालवायला देण्यामागील हेतू काय.?
- नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचेही घटना उघडकीस आली आहे. म्हणजे अमळनेर नगरपरिषद मालक आणि त्यांचेच कर्मचारी अपमानित देखील होतात तरीही “राज भवन”आणि महिला नगराध्यक्षा शांत राहतात..!
- नेमकं कोणाचं “राज” आहे आणि ह्यामगिल काय “राज” आहे..? हा ही शोधाचा विषय आहे
- अनेक गरजेचे आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे विषय नगरपरिषदेत पेंडिंग म्हणजेच करायचे बाकी असताना जिम ची गरज काय होती..?
असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ह्या जिम ला बांधून सुरू करण्यात जवळपास दिड कोटी रु खर्च झाल्याची चर्चा आहे. ह्या जिमचे उद्दघाटन 1 नोव्हेंबर 2020 मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते होणार होते परंतु वेळे अभावी ते ह्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते..






