Amalner

?️ अमळनेर कट्टा…डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रयत्नांना यश..लायन्स सर्कल चौक जवळ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित..

?️ अमळनेर कट्टा…डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रयत्नांना यश..लायन्स सर्कल चौक जवळ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित..

अमळनेर येथील डी वाय एस पी साहेब श्री. राकेशजी जाधव यांच्या संकल्पनेतून व प्रसिद्ध व्यापारी…. अरिहंत फर्निचर चे संचालक मा. श्री. जितुभाऊ झाबक यांच्या आर्थिक सहकार्यातून….. अमळनेर मधील नेहमी वर्दळ असणारा लायन्स सर्कल चौक (डॉ. संजीव चव्हाण यांच्या हॉस्पिटल जवळ) या ठिकाणी 4 चांगल्या प्रतीचे (आय पी ) सी सी टी व्ही कॅमेरे बसवून कार्यरत करण्यात आले…….. या संपूर्ण सेटअप साठी प्रसिद्ध डॉ. श्री. संजीवजी चव्हाण सर यांनी स्वतःच्या दवाखान्यात जागेसह वीज व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली.

अमळनेर शहराचे उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील महत्वाच्या चौकात आणि ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शहरातील विविध व्यापारी,बँक मॅनेजर,पेट्रोल पंप मालक,उद्योगपती इ च्या सोबत सकारात्मक चर्चा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग याबाबतीत कसा वाढविता येईल संदर्भात प्रयत्नशील आहेत. अमळनेर शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच गेल्या काही वर्षात झालेल्या मोठ्या घटना यामुळे तालुक्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे संपूर्ण शहरात जोरदारपणे सुरू आहेत.त्याच प्रमाणे गुन्हेगारांची मुजोरी देखील वाढली आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आणि त्या अनुषंगाने आज शहरातील अत्यन्त महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्या मुळे अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. याबाबतीत उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांच्या ह्या कार्याचे स्वागत असून गुन्हेगारांचा कर्दनकाळ आता तालुक्याला लाभला आहे यात शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button