डॉ . दिपक शेटे यांचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे (ता हातकणगले ) या शाळेतील सहाय्यक शिक्षक डॉ दिपक मधुकर शेटे यांचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला .
डॉक्टर दिपक शेटे गणित विषयाचे गेली वीस वर्षे अध्यापन करत आहेत .त्यांनी आपल्या अध्यापनात विविध उपक्रम राबवले आहेत . गणित लॅब , गांधीजींच्या संबंधीत साहित्य संग्रह , पोस्ट तिकीटे,नाणी , स्टॅम्प इ . चा संग्रह त्यानी केला आहे .आपल्या अध्यापन काळात त्यांनी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट ,जर्नालिझम ,एम ए एज्युकेशन तसेच गणित विषयातील पीएचडी या पदव्या संपादन केलेल्या आहेत .
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल शिक्षण महर्षी डी बी .पाटील विचार मंच , कोल्हापूर यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करून सन्मानित केले .
त्यांना संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ .डी एस घुगरे संस्था सचिव एम.ए परीट यांचे मार्गदर्शन लाभले . शाळेतील शिक्षकांची प्रोत्साहन मिळाले .






