डॉ. सुशांत पारेकर यांची ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ साठी निवड
दत्ता पारेकर पुणे
पुणे : केंद्रीय गृह खात्याच्या अधिपत्याखालील पोलीस संशोधन आणि विकास प्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ साठी डॉ. सुशांत पारेकर यांची निवड झाली आहे. केंद्र व राज्य पोलीस दलातील जवानांना उत्कृष्ठ प्रशिक्षण देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
सन 2019-20 या वर्षांमध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षण देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यासाठी सशस्त्र सीमा बल मध्ये उपकमांडंट असलेले आपल्या ग्रुपचे मेम्बर डॉ. सुशांत पारेकर यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर झाले आहे. डॉ. पारेकर यांनी नवीन भरती झालेल्या तरुणांना उल्लेखनीय मैदानी प्रशिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी सशस्त्र सीमा बलासह इतर विविध सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. सुशांत पारेकर हे आरेवाडी गावातील एक कष्टाळू आणि मेहनती वरिष्ठ अधिकारी असून लहानपणापासून हुशार आहेत. जाईल तिथे आपल्या गुणवत्तेची छाप पाडत असतात. तसेच त्यांना गरिबीची जाणीव असून गावातील होतकरू व गरजू युवकांनी कष्ट केले पाहिजे असे सांगत असतात. त्यांनी यापूर्वी देखील अनेक पुरस्कार मिळविले असून यामध्ये आणखी एका पदकाची भर पडली आहे.
डॉ पारेकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे






