Amalner

?️अमळनेर कट्टा…शहापूर बनले वाळूपुर…वाळू माफियांचा “बॉसचा” शहापूर मध्ये धुमाकूळ.. प्रशासनाच्या डोळ्यात ‘वाळू”की “दुसरं काही”..!फेकत सर्रास अवैध वाळू वाहतूक…!

?️अमळनेर कट्टा…शहापूर बनले वाळूपुर…वाळू माफियांचा “बॉसचा” शहापूर मध्ये धुमाकूळ.. प्रशासनाच्या डोळ्यात ‘वाळू”की “दुसरं काही”..!फेकत सर्रास अवैध वाळू वाहतूक…!

अमळनेर येथील पांझरा नदी काठी असलेले शहापूर हे वाळू पूर बनले आहे. या गावाच्या काठी असलेल्या नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा करून दिवसा ढवळ्या देखील वाहतूक केली जाते. रात्री तर मस्त पैकी धुमाकूळ घालत ही वाळू वाहतूक केली जाते. आता अमळनेर शहरापासून हे गाव साधारणपणे 20 ते 22 की मी अंतरावर आहे. एव्हढ्या दूर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी पोहचण्याच्या अगोदर वाळू चे डंपर ट्रॅकटर तिथून गायब होतात.साहेब निघाले आहेत किंवा आज निघणार आहेत असा निरोपच थेट तहसील कार्यालयातुनच मिळतो आणि लगेच सर्व वाहने गायब होतात.असा एक प्रकार असतो म्हणे अशी चर्चा सुरू आहे.

तर दुसऱ्या बाजूला मोठा मासा सोईस्कर पणे दुर्लक्षित केला जातो. प्रशासनाच्या डोळ्यात वाळू फेकली जाते की दुसरं काही असाही एक चर्चे चा विषय समोर येतो आहे. किरकोळ कार्यवाही करण्याचे नाटक केले जाते तसेच छोटे छोटे मासे पकडले जातात मोठ्या माशाला हात लावला जात नाही.. एकही डंपर पकडून कार्यवाही का केली जात नाही..! असे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत.टेम्पो ,ट्रॅकटर तर पकडले जातात सर्वच लक्ष मुद्दाम हिंगोणे,फापोरे,शिरूड,जळोद येथे केंद्रित केले जाते. पण पांझरा मात्र मोकळी सोडली जाते असे का ..? की मुद्दामच दुर्लक्ष केले जाते..! यामागे कोण कोणते शिलेदार कार्यरत आहेत..? अशी दबक्या आवाजात चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button