अट्टल चोरास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले यश न्यायालयाने दिली 3 दिवसाची पोलीस कस्टडी..
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर शहरप्रतिनिधी, येथील शहरातील किशोर ट्रेडिंग शॉप मध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या दलाने शिताफीने अटक केली.
सविस्तर वृत्त असे की, दि 3/12/20 च्या रात्रीला गावातील किशोर ट्रेडिंग दुकानाचा पत्रा उचकुन मोठी चोरी झाली असता सदर दुकान मालकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपीनाय माहितीनुसार पथकातील पोहेकॉ संदिप पाटील, प्रदीप पाटील, सूरज पाटील, पोना प्रवीण मंडोळे,पोशी दीपक शिंदे, परेश महाजन, चपोहेकॉ इंद्रिस पठाण,चापोना अशोक पाटील यांनी आपली सूत्र फिरवून फरार संशयित आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ वय 19 राहणार जुना पारधी वाडा,याला काल रात्री सापळा रचून अटक केली.त्याच्या कडून 50,000 रुपये किंमतीची मोटारसायकल व दुकान फोडून चोरून नेलेल्या मुद्देमाल हस्तगत करून अमळनेर पोलीस ठाण्यात हजर केला.तर सदर आरोपीस सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्रीमती सुषमा अग्रवाल यांनी सदर आरोपीस 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान सदर सदर आरोपीवर अमळनेर पोलीस ठाण्यात भाग 5, गु र न 445/2020, भादवी 379, 461, 380, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हेड कॉ सुनिल हटकर करीत आहे.






