Amalner

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना युवक काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पण..

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना युवक काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पण..

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : आज अमळनेर येथे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळगाव जिल्ह्य़ात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शहीद अन्नदाता शेतकर्‍यांना जिल्हाभरातून युवक काँग्रेस तर्फे सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात सायंकाळी सहा वाजता दिवे लावुन, मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , अमळनेर काँग्रेस जेष्ठ नेते प्रविण जैन, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील , शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, अल्पसंख्याक सेल तालुकाउपाध्यक्ष राजु भाट, निकेश जाधव, शुभम खंबायतकर, प्रमोद बडगुजर, कुणाल पाटील, शादाब तेली, हर्षल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस
जळगाव जिल्हा युवक काँग्रेस

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button