मठाची पुर्व भावी सभा संपन्न
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर येथील श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे कैलास वासी श्री बसवकुमार शिवयोगी स्वामी यांच्या ४५ वी पुण्यतिथी निमित्त व डॉ श्री शिवानंद महास्वामी यांनी सुमारे २५००० हजार कि.मी. पादयात्रा काढून जगभर बसवण्णा यांचे प्रचार व प्रसार केल्याने त्यांचे स्वागत ठेवण्यात आले आहे.
दि.१ जानेवारी रोजी श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठामधे पुर्व भावी सभा ठेवण्यात आली होती सभेमध्ये कार्यक्रमाचे स्वागत समिती अध्यक्ष हुमनाबाद आमदार राजशेखर पाटील यांना देण्यात आले जानेवारी १८ ते २५ पर्यंत चालणाऱ्या शरण सैस्क्रती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आमदार राजशेखर पाटील बोलताना या धार्मिक कार्यक्रम मध्ये कोणीही राजकीय बाब आणूं नये फक्त नागरिकांना चांगले विचार देण्यात काम होईल व २५००० कि.मी. पादयात्रा बसवण्णाचे प्रचार करणारे डॉ शिवानंद महास्वामी याचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे व कार्यक्रमात सोशल डिस्टंनस ठेवून काम करण्याची गरज आहे.
डॉ श्री शिवानंद महास्वामी बोलताना २५ जानेवारी रोजी हत्ती वरती धर्म ग्रंथ वचन साहित्य ठेवून त्यावर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात येईल तसेच कार्यक्रमात कर्नाटक चे उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार असे अनेक येणार आहेत अशी माहिती दिली.
जि.पं.सदस्य सुधीर काडादी, भाजप नेते शरणु सलगर यावेळी भाषण झाले.
ता.पं.सदस्य गोवींदराव सोमवंशी, ग्रा.पं.अध्यक्ष मंगलाबाई डोणगांवकर, ग्रा.पं.उपअध्यक्ष मल्लारी वाघमारे, माजी जि.पं.उपअध्यक्षा लता हारकुडे, सोसायटी अध्यक्ष ओमकार पटणे प्रमुख रणजित गायकवाड, श्रीमंतराव जानबा, रामराव मोरे, रेखा काडादी, अरविंद हरपल्ले, प्रवीण काडादी, बस्वराज जडगे, संभाजी गवारे, स्वागत व आभार राजकुमार निडोदे यांनी केले.






